मध्य महाराष्ट्रात मुसळधारेची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्‍यताही खात्याने वर्तविली आहे. 

नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला आहे. उत्तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हजेरी लावली आहे. 

झारखंड, सौराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच सौराष्ट्रापासून पश्‍चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील काही 
दिवसांत मॉन्सूनची पुढे प्रगती होण्यास अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी दिली. 

देशाच्या उर्वरित भागांत मॉन्सून पुढे सरकत असताना महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर वाढत आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. 30) सोमवारपर्यंत (ता. 3) राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्‍यता आहे. 

पुण्यात पावसाच्या सरी 

शहर आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 1.6 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढली असल्याने कमाल तापमानाचा पारा 1.5 अंश सेल्सिअसने कमी होऊन 28.2 अंश इतका नोंदला गेला. 

दृष्टिक्षेपात राज्यातील पाऊस (मिमी) 
लोहगाव ........ 3.2 
कोल्हापूर ........ 3 
महाबळेश्‍वर ..... 43 
सांगली ............ 1 
रत्नागिरी ............ 19 
भिरा ............... 79 
अकोला ............ 3 

Web Title: pune news rain weather