मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे -  राज्यात सक्रिय झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोर वाढत आहे. त्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मंगळवारी (ता. 18) राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढत आहे. कोकणातील घाटमाथ्यांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या काही भागांत जोरदार पाऊस पडला. मध्य-पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा; साताऱ्यातील महाबळेश्वर; नाशिकमधील इगतपुरी आणि नगरमधील अकोल्यात काही भागांत मुसळधार सुरू आहे. 

विदर्भातील काही ठिकाणी सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, बहुतांश भागाने अद्याप पावसाची सरासरीच गाठलेली नाही. त्यामुळे पश्‍चिम विदर्भातील नागरिक पावसाची वाट बघत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये तेथे चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

राजस्थान, हरियानात मॉन्सून दाखल 
राजस्थानच्या पश्‍चिमेकडील काही भागांत आणि हरियानाच्या काही भागांतही मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या बंगालचा उपसागर आणि ओडिशादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा बंगालच्या उपसागराकडून ओडिशाकडे सरकत आहे. त्यामुळे तेथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. राजस्थानचा पश्‍चिम भाग ते बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा राजस्थानच्या दिशेने सरकत असून, उत्तर प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, आंध्र प्रदेश व्यापण्याची शक्‍यता आहे. कच्छ आणि राजस्थानच्या नैर्ऋत्य भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. 

राज्यातील पाऊस (सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत, सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
पुणे ...... 10 
कोल्हापूर .... 6 
महाबळेश्‍वर ... 83 
सातारा ........ 14 
मुंबई ...... 20 
सांताक्रूझ ..... 51 
अलिबाग ....... 82 
रत्नागिरी ....... 26 
भिरा ........... 89 
गोंदिया ......... 38 
नागपूर .......... 5 

Web Title: pune news rain weather