कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - बंगालचा उपसागर व दक्षिण बांगलादेश येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडेल; तर मराठवाड्याच्या काही भागांत पावसाच्या सरी पडतील. 

झारखंड येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाच्या सरी पडतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील बहुतांश भागांत हवेचा दाब कमी झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान असून, अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी झाला असून, तो 33 अंशांपर्यंत आला आहे.

Web Title: pune news rain weather