‘साम’ वाहिनीवर वारीचे थेट प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

पुणे - ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ म्हणत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवत आहेत. मात्र, काही कारणांमुळे या वारीमध्ये सहभागी होऊ न शकणाऱ्यांना ‘साम’ वाहिनी शुक्रवार (ता. १६) पासून घरबसल्या ‘वारी’ची अनुभूती देणार आहे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या खास कार्यक्रमातून. 

चौधरी यात्रा कंपनी प्रस्तुत करत असलेल्या आणि संजीवनी पशू खाद्य मशिन व विदर्भ सेल्स नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या कार्यक्रमासाठी सपकाळ नॉलेज हब, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महिको सीड्‌स, जैन इरिगेशन आणि राजर्षी शाहू बॅंक सहप्रायोजक आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता प्रक्षेपित होणाऱ्या या कार्यक्रमाचे पुन: प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता होणार आहे.

यामध्ये सकल संतांची आषाढी वारी, वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. वारीचे खास आकर्षण असणारे पादुकांचे नीरा स्नान, उभे रिंगण, गोल रिंगण, भजन, भारुड, कीर्तन यांचा आनंद ‘साम’च्या प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. तसेच वारीचा मार्ग, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा यांसह विविध गोष्टींची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोचविली जाणार आहे. अभिनेता अंशुमन विचारे आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

दैनंदिन कार्यक्रमातील वैशिष्ट्ये...
वाट पंढरीची (दिवसभराच्या वाटचालीचा आढावा) 
वारीचा गाव (मुक्कामाच्या ठिकाणाचे महत्त्व) 
दिंड्यांतील स्पर्धा 
पंढरीची वारी (कीर्तनकारांची वारीविषयीची संकल्पना)
वारकरी म्हणे (वारकऱ्यांच्या भावना)

Web Title: pune news wari direct live on saam tv