Police Recruitment : ऐतिहासिक दिवस! पुण्यात पोलिस भरतीमध्ये पाच तृतीयपंथीयांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment

Police Recruitment : ऐतिहासिक दिवस! पुण्यात पोलिस भरतीमध्ये पाच तृतीयपंथीयांचा सहभाग

पुणेः सध्या पुण्यामध्ये पोलिस भरती सुरु आहे. आज पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पाच तृतीयपंथीयांनी भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी दोन एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलिस भरती-२०२१’ प्रक्रियेस तीन डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी परीक्षा घेण्यात आली. आज उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

आजचा दिवस एका विशेष अर्थाने महत्त्वाचा ठरला. या भरती प्रक्रियेमध्ये पाच तृतीयपंथी उमेदवारांनी सहभाग घेतला. पुणे शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना पोलिस भरतीमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पुणे शहर पोलिस दलामध्ये शिपाई आणि चालक भरतीसाठी नऊ तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

परंतु त्यापैकी एका महिला उमेदवाराने चुकून अर्ज भरला होता. तर, उर्वरित आठपैकी पाच तृतीयपंथीयांनी शुक्रवारी (ता. १७) मैदानी परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली.

टॅग्स :Pune Newspolice