पुण्यातील "सनबर्न'ला न्यायालयाचा हिरवा कंदील 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - तहसीलदाराने पुण्यातील "सनबर्न फेस्टिव्हल'ला परवानगी दिल्यामुळे हा महोत्सव थांबविण्यासाठी आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे चार दिवसांच्या महोत्सवाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. 

प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतरही "सनबर्न फेस्टिव्हल'ला विरोध कायम ठेवल्याने वारकरी संघटना आणि डीजे संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात ज्या जागेवर हा कार्यक्रम होणार आहे, त्याचे मालक दत्तात्रय पासलकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, या महोत्सवाला परवानगी दिल्याचे प्रतिज्ञापत्र तहसीलदारांनी न्यायालयात सादर केले. हिंदू जनजागृती समिती व सनातन या संस्थेने विरोध दर्शवला असतानाच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या महोत्सवाला सरकारचा आक्षेप नसल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Pune Sunburn to the court cleared