पुण्यातूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लशीचा होणार पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

पुण्यातूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा होणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लसीची योग्य तापमानात वाहतूक करण्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज दोन कोल्ड स्टोअरेज व्हॅन तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे आता फक्त लस मिळण्याची प्रतीक्षा आहे.

पुणे - पुण्यातूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा होणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लसीची योग्य तापमानात वाहतूक करण्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज दोन कोल्ड स्टोअरेज व्हॅन तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे आता फक्त लस मिळण्याची प्रतीक्षा आहे.

‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्‍सिन’ या दोन कोरोना प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, राज्यात नेमकी कोणती लस येणार, हे निश्‍चित नव्हते. त्यामुळे मुंबई येथेही राज्यात लस वितरण केंद्राची व्यवस्था उभारण्यात आली होती. कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्‍सिन यापैकी कोव्हिशिल्ड ही पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये (एसआयआय) उत्पादित केली आहे. ती लस महाराष्ट्रात मिळेल, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांना लस वितरित केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, ‘‘आठ परिमंडळांमध्ये पुण्यातून लस रवाना केली जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणीनुसार डोस पाठविण्यात येणार आहेत.’’

नव्या कोरोना स्ट्रेनवर इतर लसीही ठरतील उपयुक्त; डॉ. गुप्ते यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या शनिवारी (ता. १६) कोरोना प्रतिबंधक लस मिळेल, असे जाहीर केल्यानंतरही राज्यात लस नेमकी कधी उपलब्ध होणार, याची माहिती गुलदस्त्यात आहे. राज्याला लस मिळाल्यानंतर तेथून आठ परिमंडळ, त्यानंतर जिल्हा आणि प्रत्यक्ष लसीकरण केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातील घाई कमी करण्यासाठी तसेच, वेळेत लसीचा पुरवठा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे!

कशी आहे व्यवस्था...

  • राज्यातील आठ परिमंडळात लस पाठविणार.
  • वितरणासाठी दोन कोल्ड स्टोअरेज व्हॅन.
  • लस लवकरात लवकर मिळाल्यानंतर त्याचे वितरण लगेच करता येणार. 
  • राज्यात ५११ लसीकरण केंद्रांची स्थापन.
  • यातील बहुतांश केंद्र रुग्णालयात आहेत. त्यातही जिल्हा, वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही केंद्रे आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune supply corona vaccine to every district in the maharashtra state