पुण्यात ओलांडली चाळीशी; परभणी सर्वांत 'हॉट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

शहरांतील तापमान -
पुणे : 40.1
मुंबई : 32.8
कोल्हापूर : 37.2
नाशिक : 40.3
औरंगाबाद : 41.4
सोलापूर : 40.9
​परभणी ः 41.8

पुणे - राज्यातील उष्णतेची लाट आजही (गुरुवार) कायम असून, पुण्यातील पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. तर, परभणीमध्ये सर्वाधिक 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड आहे. यामुळे दुपारच्या उन्हाच्या चटक्‍यानंतर रात्रही उष्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात आज दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. शहरात आज 40.1 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चाळिशीपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा येत्या रविवारपर्यंत (ता. 2) 36 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

आज राज्यात परभणी येथे सर्वाधिक म्हणजे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये 41.4 आणि सोलापूरमध्ये 40.9 कमाल तापमानाचा पारा होता. बुधवारी राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या वर गेला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पारा चाळिशीच्या वर गेल्याचे आजही पहायला मिळत आहे.

का वाढलयं तापमान?
राजस्थानच्या वाळवंटावरून उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे; तसेच स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊनही कमाल तापमानाचा पारा वाढला आहे.

शहरांतील तापमान -
पुणे : 40.1
मुंबई : 32.8
कोल्हापूर : 37.2
नाशिक : 40.3
औरंगाबाद : 41.4
सोलापूर : 40.9
परभणी ः 41.8

Web Title: Pune temperature crosses 40° Celsius, Parbhani highest temperature