Pune Wall Collapse : कोंढवा दुर्घटनेचे विधिमंडळात तीव्र पडसाद

Vidhimandal-Session
Vidhimandal-Session

मुंबई - कोंढवा दुर्घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला सांगितले.

या दुर्घटनेची सहासदस्यीय समिती चौकशी करत असून ८ दिवसांत या समितीचा अहवाल येणार आहे. याप्रकरणी आर्किटेक्‍ट; तसेच स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांचे लायसन्स निलंबित करण्यात आले असून पुणे महापालिकेने त्यांना काळ्या यादीत टाकल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अजित पवार यांनी पुण्यातील कोंढवा येथील दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे १५ जणांना जीव गमवावा लागल्याचे पवार म्हणाले. पोकलेनच्या आवाजाने हादरे बसत असल्याची तक्रार शेजारच्या सोसायटीतील लोकांनी केली होती; पण त्याची दखल घेतली गेली नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच योगेश टिळेकर म्हणाले, की दुर्घटनास्थळी रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना जाण्याची वाट नव्हती. त्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. म्हणून डीसी रूलमध्ये वहिवाटीच्या रस्त्यांना जास्त प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी ६ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून, ८ दिवसांत या समितीचा अहवाल येणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. कोंढवा दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. संबंधित आर्किटेक्‍ट; तसेच स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची लायसेन्स सस्पेंड करण्यात आले असून दोघांनाही पुणे महापालिकेने काळ्या यादीत टाकल्याचेही पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com