शिक्षण देणार कैद्यांना शिक्षेत सवलत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - शिक्षणाची ओढ असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण न घेता वाम मार्गाला लागलेल्या कैद्यांना पुन्हा एक चांगली संधी मिळणार आहे. कारावासाची शिक्षा भोगत असतानाच शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांना आता शिक्षेत सवलत दिली जाणार आहे. कैद्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात प्रथमच अशा प्रकारची सवलत दिली जाणार आहे. 

अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (तुरुंग) डॉ. भूषण उपाध्याय यांनी याबाबत सांगितले, की कैद्यांनी शिक्षणाकडे वळावे, यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. कैद्यांच्या पुनर्वसनाचाच हा भाग असून, कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम ठरू शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

मात्र, शिक्षेमध्ये अशा प्रकारची सवलत सर्वांनाच मिळणार नाही. डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, की गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. इतर कैद्यांना मात्र शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाईल; मात्र त्यांनीही त्यात रस दाखवला पाहिजे. वर्षातून एकदाच या सवलतीचा लाभ घेता येणार असून, मानांकित विद्यापीठातूनच हे शिक्षण त्यांना पूर्ण करावे लागणार आहे. 

...अशी असेल सवलत 
- दहावी, बारावी किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण करणाऱ्या कैद्यांना त्यांच्या एकूण शिक्षेत पाच दिवसांची सवलत 
- या परीक्षांमध्ये प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या कैद्यांची शिक्षा आठ दिवसांनी कमी होणार 
- पदवीची परीक्षा पास होणाऱ्या कैद्यांना शिक्षेतून पंधरा दिवसांची सूट मिळणार 
- पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांची शिक्षा वीस दिवसांनी कमी होणार 
- एम.फील. आणि पीएच.डी. करणाऱ्या कैद्यांनाही अशाच प्रकारे शिक्षेत सवलत मिळणार 

Web Title: Punishment for prisoners Discount