पाच गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

परिंचे - धनकवडी (ता. पुरंदर) येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना वीजबिल थकीत असल्याने एक वर्षापासून बंद आहे. पाच गावे व चार वस्त्यामधील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था झाली आहे.

धनकवडी, दवणेवाडी, मांढर या ग्रामपंचायतीसाठी २००५ मध्ये ६५ लाख रुपये किमतीची धनकवडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेत दवणेवाडी, धनकवडी, मांढर, शिंदेवाडी, टोणपेवाडी, गायकवाडवस्ती, जगतापवस्ती, उपळेवस्ती, तांबेवस्ती या गावांचा समावेश करण्यात आला. ही योजना गावातील लोकांची समिती तयार करून हस्तांतरित करण्यात आली.

या समितीच्या भ्रष्ट कारभारामुळे वीजबिलाचा बोजा वाढत गेला १२ लाख रुपये एवढी थकबाकी झाल्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केला. ही योजना एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या योजनेचा पाणीपट्टी कर लाभधारकारांकडून नियमित वसूल केला आहे. जमा झालेल्या पैशाचा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या योजनेत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे. या बाबतची लेखी तक्रार पुरंदरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष विठ्ठल जाधव व सचिव बाळासाहेब जाधव यांना याबाबत विचारले असता पाणीपट्टी वसुली झाली नसल्याने वीजबिल थकले असल्याचे सांगितले. या योजनेच्या खर्चाचा हिशोब कधीही लोकांना समोर मांडला नाही. जमा झालेला पाणीपट्टी कर व योजनेचा खर्च याचा लेखाजोखा (ऑडिट) आजतागायत कधीच केले नसल्याचे अध्यक्ष व सचिव यांनी मान्य केले. 

धनकवडी परिसरात नळ पाणीपुरवठा योजना असल्याने सरकारने पाणी टॅंकर देत नाही. गावातील उपलब्ध पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नावर मार्ग न निघाल्यास गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सर्वसामान्य नागरिक सांगतात.

ही योजना कार्यान्वित होण्यासाठी सहा वर्षांत तीन  वेळा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी स्वखर्चाने अर्थसाह्य केले होते. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी परिसरातील ग्रामस्थांशी पाणी प्रश्‍नांवर चर्चा करून परिस्थितीची पाहणी केली.

Web Title: purandhar water issue