दिव्यांगांचे कल्याण हाच शिवाश्रमाचा उद्देश: शिवशाहीर तनपुरे

Purpose of Shiva at handicap welfare says Shivshahir Tanpure
Purpose of Shiva at handicap welfare says Shivshahir Tanpure

सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी केले.

शिर्डी येथे यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या शिवाश्रमासाठी जागेची अडचण निर्माण झाल्यावर या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्‍यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबाने सव्वा एकर जागा दान केली आहे. याच जागेवर डॉ. तनपुरे व गीते यांच्या हस्ते शिवजयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (ता. 19) शिवाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी तनपुरे व गीते परिवारातील सदस्यांसह अशोक महाराज घुमरे, महामंडलेश्वर जयानंद सरस्वती, उद्योजक शिवनाथ कापडी, किरण बडगुजर, कांतिभाई पटेल, त्रिलोकनाथ अग्रवाल, सहारा संस्थेचे सेक्रेटरी रेलीनो डिक्रूज, शामराव खुळे, माजी उपसरपंच सिताराम गीते, उपसरपंच जयश्री गीते, प्रा. रत्नाकर गडाख, सचिन ओझा, ऍड. भाग्यश्री ओझा, माजी सैनिक भागवत रणदिवे, प्रकाश खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील दिव्यांग घटकांसाठी रोजगार उपजीविकेचे साधन निर्मिती, निराधारांना आश्रय देणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारणे, दिव्यांगांसाठी वृद्धाश्रम निर्मिती, राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय अभ्यासिका आदी उपक्रम शिवाश्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. तनपुरे यांनी दिली. वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल असे सांगून देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते शिवाश्रमाचे लोकार्पण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना जलाल महाराजांनी अध्यात्म सेवेतील आपल्या कमाईचा अडीच टक्के हिस्सा प्रकल्पासाठी देण्याचे कबूल केले. किरण बडगुजर यांनी सहारा व्यसनमुक्ती केंद्राप्रमाणेच शिवाश्रमासाठी देखील सर्वांगीण मदत करण्याची ग्वाही दिली. शिवनाथ कापडी यांनी आश्रमाच्या नियोजित जागेसाठी संरक्षक भिंत बांधून देण्याचे जाहीर केले. अन्य उपस्थितांनी देखील आश्रमासाठी यथाशक्ती मदत करणार असल्याचे सांगितले.

गीते यांचे योगदान अतुल्य
आमटे परिवाराचा आदर्श घेऊन मधुकर गीते यांनी व्यसनमुक्तीचे मोठे काम सिन्नरमध्ये उभे केले आहे. शिर्डी येथे आश्रमाची नियोजित जागा वादग्रस्त असल्याचे उशिराने उघड झाले. स्वार्थी प्रवृत्तींनी या जागेबाबत फसवले त्यामुळे व्यथित झालो होतो. मृत्यूपूर्वी आईने तिच्या पेन्शनचे लाखभर रुपये आश्रमासाठी सोपवले. तिची ती शेवटची इच्छा पूर्ण होईल की नाही अशी भीती होती. मात्र, गीते यांच्या रूपाने देवदूत मदतीला धावला. त्यांचे या प्रकल्पासाठी असणारे योगदान अमूल्य असून सहाराचेकार्य शिवाश्रम देखील पुढे घेऊन जाईल असे डॉ. तनपुरे यांनी नमूद केले. बारा लाख रुपये मूल्याची जागा कोणत्याही अटीशर्तीं विना गीते कुटुंबीयांनी शिवाश्रमाच्या नावे केली. समाजातील दिव्यांग घटकांच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा असल्याचे सांगतांना डॉ. तनपुरे व त्यांच्या पत्नी मनीषा यांना भूमिपूजन करताना अश्रू अनावर झाले होते.

माझे जीवन दिव्यांगांना समर्पित
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच जीवघेण्या अपघातातून मी बचावलो. तो क्षण माझ्यासाठी पुनर्जन्म आहे. तेव्हाच मी दिव्यांगांच्या कल्याणासाठीच आयुष्य समर्पित करण्याचानिर्णय घेतला. शिवाश्रम हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणार आहे. या प्रकल्पासाठी माझा केवळ खारीचा वाटा असणार आहे. समाजातील असंख्य दानशूरांच्यासढळ मदतीतून हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वास जाईल असा विश्वास डॉ. तनपुरे यांनी व्यक्त केला. शिवाश्रमाला FCRA चे सर्टीफीकेट सुध्दा मिळाले आहे ज्याच्या आधारे परदेशातील देणग्याही स्विकारता येणार आहे.

मदतीसाठी संपर्कः
शिवगर्जना कला मंच
स्टेट बँक आँफ इंडीया, शाखा ऱाहुरी
a/c no.: 34969662949
IFSC CODE:  SBIN0001042  (Current Account)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com