गुंडगिरी करत केला  एकाने शेतातून रस्ता 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

निवेदनात म्हटले आहे, की शेताशेजारी राहणाऱ्या व्यक्‍तीने नातेवाईक जमवून दहशत निर्माण केली, तसेच माझ्या शेतातून 10 फूट रुंद व 1200 फूट लांबीचा रस्ता तयार केला आहे.

नगर, मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथील एकाने गुंडगिरी करत शेतातून रस्ता बनविल्याचा आरोप शेतकरी यशवंत ठोकळ यांनी केला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की शेताशेजारी राहणाऱ्या व्यक्‍तीने नातेवाईक जमवून दहशत निर्माण केली, तसेच माझ्या शेतातून 10 फूट रुंद व 1200 फूट लांबीचा रस्ता तयार केला आहे.

वस्तीवर मी व माझी पत्नी असे दोघेच राहतो. रस्ता व्हायला हवा; पण तो बांधावरून असावा. बेकायदेशीर रस्ता करू नये, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मटका खेळताना दोघांना पकडले 
अकोलेत अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांच्या पथकाने अकोले बसस्थानकाजवळ छापा मारून मटक्‍याचे आकडे घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. 

महेबूब लालभाई बेग व बाळू दगडू पाचपुते हे मटका नावाचा हारजिताचा खेळ खेळताना व खेळवित असताना आढळून आले. त्यांना अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

त्यांच्याजवळून रोख रक्‍कम व मटक्‍याचे साहित्य असा तीन हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस कर्मचारी संतोष वाघ करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarrel on the farm road

Tags
टॉपिकस
Topic Tags: