दत्त दर्शनाने भारावून गेले भाग्यवान विजेते 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कोल्हापूर - साम वाहिनीवरील डी. एन. विंड सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत श्री गुरुदेव दत्त मालिकेअंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बक्षीस वितरण झाले. स्पर्धेतील महाविजेते श्रेया विजयकुमार धोतमल (कोरेगाव, सातारा), चिंतामणी नीळकंठ देशपांडे (किवळे, पुणे), कृतिका वैभव बंदिष्टी (पेडगाव, नगर), पूजा कामत (वास्को, गोवा), अल्पना नाईक (मुलुंड, मुंबई) यांना या वेळी अभिषेकाची संधीही मिळाली. एकूणच श्री दत्त दर्शन आणि अभिषेकाच्या संधीमुळे आज आयुष्याचे सार्थक झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केल्या. 

डी. एन. विंड सिस्टिम्सचे नितीन वाडीकर, दिनेश बुधले, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे सचिव राजेश बाळकृष्ण खोंबारे, "सकाळ'चे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा सोहळा झाला. महाविजेत्यांना चांदीचे नाणे, गुरुचरित्राची प्रत आणि अभिषेकाची संधी असे बक्षिसाचे स्वरूप होते. या वेळी संस्थानचे सचिव श्री. खोंबारे यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. "साम'च्या विशेष मालिकेचेही कौतुक केले. 

सलग सातव्या वर्षी 8 ते 13 डिसेंबर या काळात या मालिकेचे प्रसारण झाले. गाणगापूर येथील श्री गुरुदेव दत्त स्थान माहात्म्य सांगणाऱ्या एकूण सहा भागांचा मालिकेत समावेश होता. नृसिंहवाडी येथील दत्त जयंती सोहळ्याचे प्रक्षेपणही घरबसल्या भाविकांना मिळाले. मालिकेदरम्यान प्रेक्षकांसाठी रोजच्या भागावर आधारित प्रश्‍नमंजूषा झाली. पोस्टकार्डासह एसएमएसच्या माध्यमातून या स्पर्धेत देशभरातून प्रेक्षक सहभागी झाले. त्यातून ठरलेल्या महाविजेत्यांना आज बक्षिसे देण्यात आली. या वेळी ऊर्जा क्रिएशन्सचे अरुण नाईक, सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते. "साम'चे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र कुरुंदकर यांनी संयोजन केले. प्रशांत कोडणीकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, कबीर बाग मठ संस्था (पुणे) मालिकेचे प्रायोजक होते. 

श्री गुरुदेव दत्त माहात्म्यातून जगभरातील मराठी प्रेक्षकांना आध्यात्मिक अनुभूती मिळावी, यासाठी साम वाहिनीने सलग सात वर्षे राबवलेला मालिकेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यंदाच्या मालिकेतून गाणगापूरचे माहात्म्य सर्वांना चांगल्या पद्धतीने अनुभवता आले. 
- दिनेश बुधले, डी. एन. विंड. 

साम वाहिनीच्या माध्यमातून दत्त जयंतीनिमित्त प्रसारित होणाऱ्या मालिकेतून घरबसल्या प्रेक्षकांना श्री दत्त दर्शन होते. या मालिकेचे प्रायोजक असल्याचा अभिमान आहे. येत्या काळातही "साम' वाहिनीच्या अशा मालिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल. 
- नितीन वाडीकर, डी. एन. विंड. 

Web Title: Quiz series under Shri Gurudev Datta