ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेत वर्णद्वेष : डॉ. नागपॉल 

ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेत वर्णद्वेष : डॉ. नागपॉल 

लंडन : ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेत "अस्वस्थ करणारा वर्णद्वेष' असल्याचा आरोप भारतीय वंशाचे वरिष्ठ डॉक्‍टर, ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांद नागपॉल यांनी गुरुवारी केला. येथे कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समुदायातील डॉक्‍टरना समानतेची वागणूक देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

मूळचे भारतीय असलेले मयूर कार्लेकर यांच्या इंग्लंडमधील घरासमोर वर्णद्वेषातून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. नागपॉल यांच्या आरोपाला महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. नागपॉल यांनी हा आरोप करताना अलीकडच्या सर्वेक्षणातील निष्कर्षाचा संदर्भ दिला आहे. ब्रिटनमध्ये वर्णद्वेषाला सामोरे जाणारे बहुतांश डॉक्‍टर भारतीय आहेत. 

कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समुदायातील डॉक्‍टरांचा राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेकडून गैरफायदा घेतला जात आहे. या समुदायातील केवळ निम्म्या डॉक्‍टरांनाच त्यांना कामाच्या ठिकाणी सांस्कृतिकदृष्ट्या अंतर्भूत करून घेतले जाते वा त्यांचा सन्मान राखला जात असल्याचे वाटते, असेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेतील वरिष्ठ व्यवस्थापकीय पातळीवर कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समुदायातील डॉक्‍टरांना योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप डॉ. नागपॉल यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com