महाजन-विखे यांची भेट; कोणतं मंत्रीपद मिळणार अशा चर्चांना उधाण

महाजन-विखे यांची भेट; कोणतं मंत्रीपद मिळणार अशा चर्चांना उधाण

मुंबई : कॉंग्रेस पक्षात केवळ तांत्रिक कारणामुळे असलेले नाराज नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची येथे सोमवारी भेट घेतली.

विखे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून विके कोणत्या मंत्रीपदावर दावा करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. म्हणूनच, विखे यांचा भाजप प्रवेश आणि त्यांची मंत्रिमंडळात लागणारी वर्णी याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नगरमध्ये मुलगा सुजय विखे-पाटील यांना कॉंग्रेसचे तिकीट मिळावे यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही होते; मात्र आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. तसेच कॉंग्रेस पक्षानेदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यातच राधाकृष्ण विखे यांनी कॉंग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी अहमदनगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. त्यामुळे या दोन्ही जागा विखे पाटलांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com