'राफेलमध्ये 284 कोटींचे भाजप नेत्यांचे कमिशन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

औरंगाबाद : राफेल देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर खोटे पुरावे दिले. फ्रान्सच्या 'द डसॉल्ट एविएशन' कंपनीने केवळ 8 लाख रुपये उलाढाल असलेल्या रिलायन्स एअरपोर्ट लिमिटेडचे दहा रुपये किंमतीचे शेअर्स तब्बल 284 कोटींमध्ये का खरेदी केले याची चौकशी करण्यात यावी. हीच रक्कम भाजप नेत्यांचे कमिशन आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी आज (शुक्रवार) केला. 

पत्रकार परिषदेत राफेल गैरव्यवहारावर मोढवाडीया म्हणाले, राफेल गैरव्यवहार बाहेर येऊ नये म्हणून भाजप संसदीय समितीच्या चौकशीपासून पळ काढत आहे. कॉंग्रेसने बोफोर्स, टूजी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी केली. आता भाजपवर लपवाछपवीचा वेळ का आली आहे? संरक्षण खरेदी पद्धती, संरक्षण कॅबिनेट समिती आणि संरक्षण संपादन परिषदेला टाळून खरेदीचा करार करण्यात आला आहे. हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची आवश्‍यकता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानांची संख्या 36 एवढी कमी का केली? असा सवाल मोढवाडिया यांनी केला.

राफेल व्यवहारामधील भ्रष्टाचार, विमानांची किंमत, मित्राला फायदा मिळवून देण्यासंबधी चौकशी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आराखडा नाही. हे काम संसदीय समिती करू शकते, त्यामुळे भाजपने संसदेतील चर्चेअभावी समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

41 हजार 205 कोटींचे नुकसान 

यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बोलीनुसार प्रत्येक विमानाची किंमत 526.10 कोटी एवढी होती. त्यानुसार 36 विमानांची किंमत 18 हजार 940 कोटी रुपये होते. मोदी सरकारने 36 विमाने 60.145 कोटीत खरेदी केली आहेत. त्यामुळे देशाचे 41 हजार 204 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप मोढवाडिया यांनी केला. 

Web Title: In Rafale Deal Commission of 284 Crore involved in BJP leaders