विषमतेने भांडवलशाही धोक्‍यात -  डॉ. रघुराम राजन

विषमतेने भांडवलशाही धोक्‍यात -  डॉ. रघुराम राजन

मुंबई - आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे भांडवलशाही धोक्‍यात आल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले. मंगळवारी (ता. १२) यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले. 

उजव्या आणि डाव्या विचारसरणीमुळे सामाजिक प्रश्‍न सुटलेले नाहीत. यामुळे आर्थिक आणि सामाजिक विषमता जगभरात वेगाने वाढत असल्याबद्दल राजन यांनी चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञान प्रगतीने रोजगारावर गदा आली असली तरी, शैक्षणिक क्षेत्रासाठी मात्र ते वरदान ठरले आहे. समाजाला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञानामुळे परस्पर नात्यांमधील दुरावा वाढला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात ही एक समस्या बनली आहे. मात्र त्याचवेळी फ्लॅशमॉबसारख्या संकल्पना समाजाला एकत्र आणत आहेत, असे राजन यांनी नमूद केले.

मुंबईत गिरण्या बंद पडल्यानंतर नोकरी गेल्याने गिरणी कामगार मोठ्या संख्येने गावी परतला. अशाच प्रकारची स्थिती पाश्‍चिमात्य देशांमध्ये दिसून येत आहे. इथले मोठे कारखाने बंद पडले आहेत. शिवाय या देशांमध्ये वाढते वयोमान धोक्‍याची घंटा वाढवत आहे. कामगारांवर अवलंबून राहणाऱ्या वृद्धांची संख्या वाढत असून, त्याचा परिणाम सामाजिक विकासावर झाल्याचे राजन यांनी सांगितले.

सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या दृष्टिकोनात व्यापक धोरणांचा अवलंब केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत बाजारपेठेचा विस्तार झाला, सरकारची सेवा सुधारली, मात्र सामजिक विकास रखडला असल्याबद्दल राजन यांनी चिंता व्यक्त केली. ‘दि थर्ड पिलर’ या आपल्या नव्या पुस्तकात रघुराम राजन यांनी आर्थिक आणि सामाजिक विकासाचा धांडोळा घेतला  आहे.

२००८ मधील जागतिक मंदीनंतर गरीब आणखी गरीब बनला आहे. काही मूठभर धनिकांच्या संपत्तीत मात्र प्रचंड वाढ झाली.
- डॉ. रघुराम राजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com