राहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुख्यमंत्री म्हणाले, की सत्य हे नेहमीच तपळपणाऱ्या सूर्यासारखे असते. राफेल प्रकरणात कोणत्याही चौकशीची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आमची भूमिकाच या निकालातून अधोरेखित झाली आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याबद्दल आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केल्याबद्दल आता कॉंग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाचा खोटारडेपणा उघडकीस आला असून, त्यांनी संपूर्ण देशात राफेलबाबत भ्रामक प्रचारतंत्र राबविले. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालविला आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यानसुद्धा जनतेची दिशाभूल केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही कॉंग्रेसने माफी मागायला हवी, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi should apologize Devendra Fadnavis