राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

भिवंडी : महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या (ता. 12) भिवंडी न्यायालयात सुनावणीला हजर राहणार आहेत. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

सोनाळे गावातील मैदानात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी संघावर गांधीजींच्या हत्येचा आरोप केला होता. त्याप्रकरणी संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यावर भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. ए. शेख यांच्यासमोर उद्या सुनावणी होणार आहे, असे ऍड. नारायण अय्यर यांनी सांगितले. 

या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधातील आरोपनिश्‍चिती होण्याची शक्‍यता आहे. मागील सुनावणीवेळी राहुल गांधी गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांचे वकील ऍड. नारायण अय्यर यांनी गांधीहत्या हे ऐतिहासिक प्रकरण असल्याने कोर्टापुढे सबळ पुरावा यावा आणि वस्तुस्थिती समोर यावी, म्हणून समन्स ट्रायल प्रक्रियेद्वारे ही याचिका चालवावी, अशी मागणी केली होती. याबाबतही निर्णय होणे अपेक्षित आहे. 

Web Title: Rahul Gandhi today in Bhiwandi court