काँग्रेस विधीमंडळनेते निवडण्याचा अधिकार राहुल गांधींना; ठराव मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मे 2019

काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवीन नेते निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आज (ता.20) एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी ठराव मांडला तर या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर आणि शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले आहे.

मुंबई: काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवीन नेते निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आज (ता.20) एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी ठराव मांडला तर या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर आणि शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर भाजपकडून डॉ. सुजय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीरसभेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावरून काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसविधीमंडळाच्या नेत्याची जागा रिक्त झाली होती.

Web Title: Rahul Gandhis right to choose Congress legislative Assembly leadar