रेल्वेचे खानपान महाग

railway
railway

मुंबई - लांब पल्ल्याच्या मेल, एक्‍स्प्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार आहेत. साधारण ५ ते १५ रुपयांपर्यंतची वाढ असून, त्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. हे दर २८ मार्च २०२० पासून लागू होणार आहेत. 

रेल्वे बोर्डाच्या अन्न व पेय विभागाच्या संचालकांकडून नव्या दरांचे परिपत्रक सर्व विभागीय रेल्वे मंडळांना पाठविण्यात आले. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांसह राजधानी, दुरांतो, शताब्दी या विशेष गाड्यांमधील खानपानही महागणार आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट बुक करतानाच जेवणाचे पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवासाच्या श्रेणीनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. २०१४ नंतर पहिल्यांदा दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

एसीसाठी दर 
    १५ रुपयांना मिळणारा चहा २० रुपयांना मिळणार 
    नाश्‍त्यासाठी ९७ ऐवजी १०५ रुपये द्यावे लागतील. 
    जेवणासाठी १७५ ऐवजी १८५ रुपये मोजावे लागणार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com