पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

मुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत यादरम्यान पावसाची शक्‍यता असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी वर्तविले आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे पूर्व विदर्भात धुके असेल आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागांत 15 ते 17 डिसेंबर रोजी काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Rain East Vidarbha