मॉन्सून कोकणच्या उंबरठ्यावर

अपेक्षेपेक्षा तीन दिवस उशिरा केरळात दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने प्रवास करत उत्तर कर्नाटक गाठला आहे.
Monsoon
MonsoonSakal

पुणे - अपेक्षेपेक्षा तीन दिवस उशिरा केरळात (Keral) दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) (Monsoon) वेगाने प्रवास करत उत्तर कर्नाटक (North Karnataka) गाठला आहे. त्यामुळे तो आता लवकरच तळ कोकणच्या उंबरठ्यावर दाखल होईल. महाराष्ट्रात सर्वसाधारणतः सहा जूनला मॉन्सून पोचतो. त्याच दरम्यान यंदा तो बरसेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. (Rain Enter in Konkan Environment)

मॉन्सूनने वेगाने चाल करत उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशपर्यंत शुक्रवारी मजल मारली. येत्या दोन ते तीन दिवसांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर तो तळकोकणात हजेरी लावेल. अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिरा दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘यास’ चक्रीवादळाने मॉन्सूनचा वेग काही काळ वाढविला. मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते.

Monsoon
राज्यात नवे रुग्ण 15 हजाराच्या आत; मृतांची संख्याही घटली

नियमित वेळेच्या दोन दिवस उशिरा मॉन्सून गुरुवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी त्याने वेगाने वाटचाल करत संपूर्ण केरळसह, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, कर्नाटकचा दक्षिण अंतर्गत भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागांत प्रगती केली आहे. सध्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने संपूर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com