गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सोमवारी दमदार पाऊस पडला. या भागातील नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले. गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला असून, पिके पाण्यात गेली आहेत. तर, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणे ओव्हरफ्लो झाली असून, धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा, सिंरोचा, भामरागडसह अनेक तालुके पुरामुळे प्रभावीत झाले असून, शेकडो गावांचा तालुका, जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जोराच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. पुराचे पाणी गावात शिरून अनेक गावांतील नागरिकांना स्थलांतरित करावे लागले.  

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने, भंडारदारा, निळवंडे धरण भरले आहे. सातारा जिल्‍ह्यात कोयना, धोम, कण्हेर, बलकवडी व उरमोडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सांगलीतील कसबेडिग्रज -मौजेडिग्रज बंधारा दुसऱ्यादा पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून, धरणांतील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच आहे.

Web Title: rain in Gadchiroli, Nanded