राज्यात पुन्हा दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

नाशिकमध्ये दमदार हजेरी
पावसाने आज नाशिक जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पश्‍चिम पट्ट्यात धरणाच्या साठ्यात वाढ होत असून, गंगापूर धरण आणखी एका दिवसात साठ टक्के भरण्याची आशा आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस संततधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

कोकणात मुसळधारेचा इशारा; मराठवाड्यातही पाऊस शक्य
पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. उद्या (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे.

बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला मॉन्सूनचा आस यामुळे पावसाला पोषक हवामान झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, गुजरात, राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेशात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. 

नाशिकमध्ये दमदार हजेरी
पावसाने आज नाशिक जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पश्‍चिम पट्ट्यात धरणाच्या साठ्यात वाढ होत असून, गंगापूर धरण आणखी एका दिवसात साठ टक्के भरण्याची आशा आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस संततधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मराठवाड्यात हलका पाऊस
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ८३ मंडळांत शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हलका पाऊस झाला.आकाशात ढगांनी मोठी गर्दी केली.

कसारा घाटात दरड
नाशिक - संततधार पावसामुळे कसारा घाटात लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळल्याने मुंबई- नाशिक रेल्वे वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. टीजीआर थ्री भागात घडलेली या महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कसारा घाट परिसराला चांगलेच झोडपून काढल्याने मुंबई- नाशिक लोहमार्गावरील कसारा घाटातील मधल्या पर्यायी मार्गावर महाकाय दगड कोसळला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Environment