आजपासून तीन दिवस कोसळणार सरींवर सरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

कोकण, मध्य महाराष्ट्रात कोसळणार
ऑगस्ट अखेरपासून कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. मंगळवारी (ता. 10) देखील या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाच्या सरी पडतील. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात गेले आहे.

गणरायाला निरोप देताना वरुणराज हजेरी लावणार
पुणे - आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देताना पुणे शहर आणि परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरीदेखील हजेरी लावतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 9) वर्तविण्यात आला. येत्या गुरुवारी (ता. 12) गणपती विसर्जन होणार आहे.

दरम्यान, शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 3.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तेथे एक जूनपासून आतापर्यंत 816.9 मिलिमीटर पाऊस पडला, तर पाषाण येथे सोमवारी सकाळपर्यंत 6.1 मिलिमीटर पाऊस पडला असून, यंदाच्या पावसाळ्यात 961.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात कोसळणार
ऑगस्ट अखेरपासून कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. मंगळवारी (ता. 10) देखील या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाच्या सरी पडतील. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्‍यता असल्याने तेथील पावसाचा जोरही ओसरणार आहे. मात्र, गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्‍य आहे.

पुण्यातील अंदाज
मंगळवार - हलक्‍या स्वरूपाचा पाऊस
बुधवार, गुरुवार - आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्‍या सरी पडणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Maharashtra