प्रमुख नद्यांची खोरी तहानलेलीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील तळकोकणात हजेरी लावतो. यंदा मात्र केरळात त्याचे ८ जूनला आगमन झाले, त्यामुळे महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला या वर्षी २० जूनची तारीख उजाडली. पावसाने गुरुवारी राज्याची सरासरी गाठली. साधारणतः १ जून ते ११ जुलै दरम्यान ३२३.२ मिलिमीटर पाऊस पडतो.

राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली
पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत.

केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील तळकोकणात हजेरी लावतो. यंदा मात्र केरळात त्याचे ८ जूनला आगमन झाले, त्यामुळे महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला या वर्षी २० जूनची तारीख उजाडली. पावसाने गुरुवारी राज्याची सरासरी गाठली. साधारणतः १ जून ते ११ जुलै दरम्यान ३२३.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा एक टक्का जास्त म्हणजे ३२७.१ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याच दरम्यान देशातील सरासरीच्या वजा १२ टक्के पाऊस पडला आहे. 

मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा हे चार हवामान विभाग आहेत. कोकणासह (सरासरीच्या १९ टक्के पाऊस पडला) मध्य महाराष्ट्रात (१७) पावसाने सरासरी गाठली असली, तरीही विदर्भ (-२३ टक्के) आणि मराठवाडा (-३३ टक्के) कोरडा आहे. त्याचा परिणाम खोऱ्यांवर झाला आहे. त्र्यंबकेश्‍वर व महाबळेश्‍वर येथील नद्यांच्या खोऱ्यांत पावसाने हजेरी लावली आहे. तेथे सरासरीच्या २० ते ५९ टक्के जास्त पाऊस पडला. भीमा, तापी, वर्धा, वैनगंगा, वर्धा, मांजरा या नद्यांच्या खोऱ्यांत सरासरी गाठलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain River Water Shortage