सातारा, नगर, नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला. सातारा, नगर, नाशिकसह पुण्यालगतच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.

नाशिक : आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला. सातारा, नगर, नाशिकसह पुण्यालगतच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसला असून, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.

नाशिक शहरालगतचा देवळाली कॅम्प, भगूर परिसर, त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यांतील काही गावांतही मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्‍यामध्ये गारपिटीने आंब्याच्या बागांचे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, बाजरी आणि डाळिंब यांचेही नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर परिसरातही पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.  मुरबाड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे या भागातील आंब्याचे मोठे नुकसान. तसेच कल्याण पूर्व मध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित.

Web Title: Rain in various part in Maharashtra