पाच लाख वारकऱ्यांना मिळणार रेनकोट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी दिली.

श्रीपूर (जि. सोलापूर) - संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यांत या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी दिली.

गेल्या वर्षी ऐन पालखी प्रस्थानाच्या तोंडावर सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्लॅस्टिक कागद वापरण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. वारकऱ्यांची ही अडचण लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयातून मुक्ती दिल्याने मोठा दिलासा मिळाला होता. तसेच पुढील वर्षी विठुरायाच्या भक्तांना पावसापासून दिलासा मिळावा यासाठी आम्ही सेवारूपाने काही तरतूद करू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता रेनकोट वितरणाच्या माध्यमातून त्यांनी या शब्दाची पूर्तता केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raincoat give to warkari Devendra Fadnavis