लातूर, नांदेडमध्ये पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - उन्हाचा चटका वाढला असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) पावसाचे ढग गोळा झाले होते. दुपारनंतर उकाड्यात वाढ हाेऊन लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, नांदेडमधील मुखेड, बिलोली, धर्माबाद, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात वाऱ्यासह पूर्वमाेसमी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

Web Title: Rainfall in Latur Nanded