जुन्याच पद्धतीने होतेय पावसाचे मोजमाप

Rainfall-Meter
Rainfall-Meter

राज्यात केवळ 2 हजार 82 ठिकाणीच पर्जन्यमापक उपलब्ध
भडगाव - सध्याची बदलती नैसर्गिक परिस्थिती पाहता, बैलाचे एक शिंग ओले, तर दुसरे कोरडे राहते इतका पाऊस लहरी झाला आहे. राज्यातील 44 हजार 600 गावांचा पाऊस अवघा 2 हजार 82 ठिकाणच्या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मोजला जातो. त्यामुळे राज्यातील पडलेल्या पावसाची आकडेवारी कितपत खरी व वास्तवतेला धरून आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी महसूल विभागाकडून प्रत्येक मंडळ, ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालयावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. पावसाळ्यात दररोज सकाळी आठला 24 तासांत पडलेल्या पावसाची नोंद घेतली जाते. तेथे पडलेला पाऊस म्हणजे मंडळातील समाविष्ट गावांचा पाऊस समजला जातो.

तालुक्‍यातील मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी तालुक्‍याचा एकूण पाऊस मानला जातो. तर, तालुक्‍याच्या सरासरी पावसाची माहिती जिल्हास्तरावर पाठवून धोरण निश्‍चित केले जाते. राज्यात पाऊस मोजण्याची पद्धत वर्षानुवर्षे आहे तशीच सुरू आहे.

केवळ 2 हजार 82 यंत्र
राज्यात सहा महसूल विभागात 32 जिल्ह्यांत एकूण 44 हजार 600 गावे आहेत. एकूण 2 हजार 82 महसूल मंडळे आहेत. त्यामुळे राज्यातील 44 हजार 600 गावांचा पाऊस अवघा 2 हजार 82 पर्जन्यमापक यंत्रावर मोजला जातो. एका मंडळात साधारणपणे 10 ते 12 गावांचा समावेश असतो. म्हणजेच मंडळात एका गावात (पर्जन्यमापक बसलेले गाव) पडलेला पाऊस हा सर्वच गावांचा समजला जातो. सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज खुद्द राज्याच्या हवामान खात्यालाही येत नाही. त्यामुळे एकाच गावातील पर्जन्यमापकावरून मंडळातील इतर समाविष्ट गावांचा पाऊस गृहीत धरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

नवीन पद्धत विकसित करणे आवश्‍यक
शासनाने किमान गावपातळीवर पाऊस मोजण्याची यंत्रणा शासनाने कार्यान्वित करणे गरजेचे आहे. एका गावात पाऊस पडला, म्हणजे इतर गावांतही पाऊस पडला, असा होत नाही. "पावसाचा नाही राहिला आता पूर्वीसारखा सार्वत्रिक खेळ, मग नाममात्र यंत्रात कसा बसेल सरासरीचा मेळ' ही वास्तवता समजून सर्वसमावेशक पद्धत अवलंबावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महसूल विभाग ...... मंडळ संख्या ....... गावे संख्या
कोकण .................. 239 ............... 6354
नाशिक .................. 350 ............... 6615
पुणे ....................... 420 ............... 6722
नागपूर ................... 275 ................ 8697
अमरावती ............... 377 ................ 7343
औरंगाबाद ............... 421 ................ 8569

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com