पावसाचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 

कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता. ११) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात नैॡत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.

Web Title: Rainfall will increase