Loksabha 2019 : मोदी-शहांना हरवायचंच; त्यासाठीच मी काम करणार

Loksabha 2019 : मोदी-शहांना हरवायचंच; त्यासाठीच मी काम करणार

मुंबई : देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, असे मी यापूर्वी सांगितले होते. शरद पवार आणि मी विमानात एकत्र भेटलो होतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले. देश आता खूप मोठ्या संकटात आहे. आता हेच लोक तुमच्याकडे येतील, थैल्ल्ला रिकाम्या करतील. आत्ताची निवडणूक मोदी, शहा विरुद्ध देश अशी आहे. त्यांना आता हरवायचे आहे, त्यासाठी मी काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, अजित पवारांनी सांगितले होते, की आम्हाला मनसेसोबत हवा आहे. त्यानंतर मी त्यांना फोन केला, कुठे भेटता येईल? आघाडी करायची असे आम्ही काय बोललो का? त्यावर त्यांचे उत्तर नाही, असेच आले. माझ्याशी न बोलता तुम्ही वाटेल तेे का बोलता?, अशा शब्दांत मी त्यांच्याशी बोललो होतो. मी त्यांना तेव्हाच सांगितले, की लोकसभा लढविण्यास मी तयार नाही. माझ्यासाठी कोणताही पक्ष नाही. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी चौकीदाराच्या मोहिमेबाबतही मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com