ईडीच्या चौकशीवर राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या (ईडी) नोटिसीचा देखील आदर करू, असे राज यांनी म्हटले आहे. 

इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होणार, पण तरीही तुम्ही शांत रहा.

Image may contain: 1 person
 
तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. 
आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच, असे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray appeal to PartyWorkers on ED inquiry