Raj Thackeray : 'बारसू रिफायनरी'वरुन राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका; कातळ शिल्पाचे सॅटेलाईट फोटो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray News

Raj Thackeray : 'बारसू रिफायनरी'वरुन राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका; कातळ शिल्पाचे सॅटेलाईट फोटो...

रत्नागिरीः राज ठाकरे यांनी आज रत्नागिरीत येथे जाहीर सभा घेतली. कोकणवासीयांना आपले हक्क कळले पाहिजेत. काही लोक तुमच्या जमिनी बळकावण्यासाठी आसुसले असल्याचं राज यांनी सांगितलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

'आज उद्धव ठाकरे बारसुला विरोध करण्यासाठी कोकणात आले होते. परंतु मुंबईतला महापौरांचा बंगला ढापतांना त्यांना हा विचार आला नाही. असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. ते म्हणाले की, जी बारसूतील स्थानिकांची भूमिका आहे, तिच आमची भावना आहे. परंतु लोक तुम्हाला निवडून देतात. तुम्ही लोकांच्या भल्याचा विचार केला पाहिजे. त्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील, याबाबत निर्णय घेतला पाहिजे.

राज ठाकरे यांनी बारसूतील कातळ शिल्पाविषयी माहिती सांगितली. युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत. त्या संस्थेने आजूबाजूला विकासकामे व्हावेत की नाही हे ठरवलं आहे. बारसूत सापडलेल्या कातळ शिल्पाच्या परिसरात तीन किलोमीटरच्या अंतरात विकासकामे करता येत नाहीत. तरीही सरकार घाट घालत आहे. राज ठाकरेंनी यासंदर्भातील फोटो आणि मॅप उपस्थितांना दाखवले.

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे...

  • तुम्हाला हवा होता म्हणून मुंबईत्या महापौरांचा बंगला ढापला तो विचारुन ढापलात का?

  • सरकार म्हणतंय बारसूकरांची जी भावना तीच आमची भावना

  • लोकं तुम्हाला निवडून देतात, तेव्हा तुम्ही लोकांचा विचार करावाच लागेल

  • लोकांनो, तुम्ही अलर्ट राहा. हे सगळे तुमची धुळधान करतील

  • या सगळ्यातून माझा कोकण वाचवा, एवढीच माझी भूमिका आहे

  • कातळ शिल्पाच्या भोवती तीन किलोमीटर कुठलाही प्रकल्प करता येत नाही

  • तरीदेखील समृद्ध वारशाला नख लावण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे

अजित पवारांवर टीका

राज ठाकरे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून कोण कुठल्या पक्षात आहे , हे लक्षातच येत नाही. शरद पवारांच्या राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता, तो काल संपला. खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता? राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत.. तू गप्प बस, तू शांत बस, माईक हातातून घे.

'पवार साहेब म्हणाले असतील, मी आत्ता राजीनामा दिला तर हा माणूस असा वागतोय. उद्या मलाही गप्प बसायला लावेल. त्यामुळेच पवार साहेबांना राजीनामा मागे घेतला असेल. खरं तर अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या, होतंय ते बरं होतंय असं अजित पवारांना वाटत होतं.' असं राज ठाकरे म्हणाले.