आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुण्यात गरजले राज ठाकरे....!

Raj Thackeray Criticised Government In Rally At Pune
Raj Thackeray Criticised Government In Rally At Pune

पुणे : शहरात आज (ता. 27 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गणेश कला क्रीडा येथे आयोजित या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे इतर कार्यकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पुणे शहरासाठी विविध पदांवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. याप्रसंगी मंचावरुन कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

केवळ आरक्षणच नव्हे तर नोटबंदी, परप्रांतीय आणि राम मंदिर या मुद्द्यांवरही राज यांनी भाषणातून सरकारवर निशाणा साधला. आपल्या भाषणात नेमकं काय टिकास्त्र राज ठाकरे यांनी सोडलं हे सांगणारे त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार हे जनतेच्या भावनांशी खेळतंय. 
  • आरक्षण जातीवर नको, आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे.
  • विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे घाणेरडा पंतप्रधान. त्यांनीच जातीचं विष देशात कालवलं. 
  • विरोधी पक्षात असतानाचा चंद्रकांत पाटलांचा फोटो (2011 चा फोटो) माझ्या मोबाईलमध्ये आहे. गळ्यात कापड आणि त्यावर 'मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे' असं लिहीलं होतं. मग सत्तेत येउन चार वर्ष झाले. काय केलं आतापर्यंत?
  • खासगी उद्योग धंद्यांना सरकार पाठिंबा देतंय, सरकारी उद्योग आणि सरकारी संस्था बंद पाडतंय हे सरकार, तर आरक्षण मिळेल कुठून?
  • महाराष्ट्रातल्या स्थानिक 80 ते 90 टक्के मुलांना नोकऱ्या मिळणार असेल तर आरक्षणाची गरजच महाराष्ट्रात भासणार नाही.
  • महाराष्ट्रात जर खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या मराठा, धनगर अशा समाजातल्या तरुणांना मिळत नसेल तर त्या नोकऱ्या कुठे जात आहेत? 
  • नोकऱ्यांबाबत महाराष्ट्रातल्या मुला मुलींची पोट भरु देत आणि उरलं तर परप्रांतीयांना दिलं जाईल. 
  • नोटबंदीवरुन सरकारनं देशात आर्थिक खड्डा खणला.
  • ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची आता वेळ आली आहे. 
  • भाजपनं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
  • महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचंय का झारखंड करायचंय?
  • आपण जातीवरुनच एकमेकांशी जुंपतो तर बाहेरच्या राज्यातील लोक हसतात आपल्यावर. 
  • अहमदाबादमध्ये पहिली पासून गुजरातीची सक्ती आहे. महाराष्ट्रात मराठी सक्तीची का होत नाही? 
  • राहुल गांधींनी मोदींना एक मिठी मारली. मोदी बाहेरच्या देशात जाऊन इतक्या मिठ्या मारतात त्यात एका मिठीची भर पडली तर काय फरक पडला? 
  • माझ्या देशाचा पंतप्रधान देशाचा असावा, एका राज्याचा नव्हे.
  • प्रत्येकाने आपापला धर्मा आपल्या घरात सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला सांगू नये काय करायला पाहिजे अन् काय नको ते...
  • नमाज पढताना लाउड स्पीकरची काय गरज? नमाज घरात पढा ना?
  • राम मंदिर बांधण्याचं अमित शाहांना चार वर्षानंतर आठवलं?
  • महाराष्ट्रातल्या राजकारणातील माझा ठोकताळा नेहमी बरोबर ठरतो.
  • आरक्षणासाठी, दंगलींसाठी राजकारणी जनतेचा वापर करुन घेत आहेत.
  • पुन्हा महाराष्ट्रातला मराठी बळी जाता कामा नये. 
  • दुसऱ्याची पोरं (दुसऱ्याने केलेल्या कामांचं श्रेय) कडेवर घेऊन फिरवण्यात काय आनंद आहे काय माहित शिवसेना आणि भाजपला?  
  • माझं शिक्षण आणि आरक्षण या विषयावर विचार सुरु आहे. त्यासाठी योग्य वेळी मी तुम्हाला हाक देईन, त्यावेळेला या...

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com