'इंच-इंच विकू' अशी महाराष्ट्राची परिस्थिती : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले.

मुंबई : मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले.

वांद्रे येथील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत वसाहतीतील कर्मचाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. 

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

- 'इंच-इंच जमीन दिसली की टाकू विकून', अशी सध्याची परिस्थिती आहे. 

- या सरकारी कॉलनीत राहणारा व्यक्ती याच जागेवर इथेच राहिल. 

- सरकारची हिंमत असेल तर त्यांनी काढून दाखवावे.

- मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आलोय.

- आमचा विदर्भ कशात कमी आहे, असे एका जाहिरातीमध्ये सांगितले गेले.

- विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- तोडण्याचे राजकारण केले जात आहे जोडण्याचे नाही.

- तुमची घरे तुम्हाला याच जागी मिळणार

- तुमच्या येणाऱ्या पिढ्या इथेच घालवतील.

- परप्रांतीयांसाठी मराठी माणसाला डावलले जात आहे.

- चाललय तसे चालू राहू दे, तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही.

- जसे शिवाजी पार्क तसे माझ्यासाठी वांद्रे पूर्व

- मुंबई गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेन.

- सरकारी कॉलनीतील मराठी माणूस इथेच राहणार.

- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख राज यांनी सांबा म्हणून केला. 
 

Web Title: raj thackeray criticizes state BJP Government