राज ठाकरेंशी भेटीनंतर ममतादिदी EVM बद्दल‌ म्हणाल्या...

टीम ई-सकाळ
बुधवार, 31 जुलै 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज (बुधवार) भेट घेतली. इव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

कोलकाता : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज (बुधवार) भेट घेतली. इव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नको तर बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

ममता बॅनर्जी आणि राज ठाकरे या उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. लोकसभेच्या निकालानंतर इव्हीएमच्या मुद्दावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे सर्व विरोधी पक्षांतील नेतेमंडळींची भेट घेत आहेत. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी इव्हीएमसह विविध मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या मागण्या धडकावून लावल्या होत्या. तसेच त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.

निवडणूक आयोगावर विश्वास नाही : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचे म्हटले. इव्हीएमची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन मांडली. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. माझा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वासच उडाला आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray meets Mamata Banerjee on EVM Issue