सेहगल यांना विरोध नाही - राज ठाकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुंबई - ""नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही,'' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. 

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार असल्याने मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी विरोध केला होता. संमेलनाचे उद्‌घाटन मराठी साहित्यिकाच्या हस्ते व्हावे; अन्यथा संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले. आयोजकांनी रद्द केलेले निमंत्रण आणि मनसेची भूमिका पाहता यावर चौफेर टीका होता असताना राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. ""नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो,'' असे त्यांनी म्हटले आहे. ""मराठी संस्कृतीची जी महत्त्वाची शक्तिस्थळे आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुदा फक्त महाराष्ट्रातच असावी,'' असे राज यांनी म्हटले आहे.

Web Title: Raj Thackeray is not opposed to Nayantara Sehgal