"राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?"; सचिन सावंतांचा खोचक टोला

raj thackeray or someone else sachin sawant tweeted a old caricature of raj over ayodhya tour
raj thackeray or someone else sachin sawant tweeted a old caricature of raj over ayodhya tour esakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून मशिंदीवरील भोगे हटवण्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यातच राज यांनी ते पाच जून रोजी आयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेवरून कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केलं आहे. या व्यंगचित्रासोबत त्यांनी "मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?" असे म्हटले आहे.

व्यंगचित्रात नेमकं काय म्हटलंय?

या व्यंगचित्रात आपल्याला विश्व हिंदू परिषद व भाजपा चलो अयोध्या असं म्हणताना दिसत आहेत तर प्रभू श्रीराम हे त्यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. ‘राममंदिर’ नव्हे…!” असं म्हणताना दिसत आहेत.

raj thackeray or someone else sachin sawant tweeted a old caricature of raj over ayodhya tour
''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घोषणेनंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या लढ्यात प्रत्यक्ष काम करत होती. आम्ही अयोध्येला जाणार आहोत. अयोध्येला जाण्याची तारीख ठरवू. आमची राजकीय यात्रा नाही.आमची ही श्रद्धेची यात्रा आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.

raj thackeray or someone else sachin sawant tweeted a old caricature of raj over ayodhya tour
"९० टक्के बांधकामं बेकायदेशीर आहेत, अगदी…'; नारायण राणेंचा आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com