Raj Thackrey: '...परत त्यांना मतदान केलंत तर चाबकाने मारीन'! राज ठाकरेंनी भरला दम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackrey

Raj Thackrey: '...परत त्यांना मतदान केलंत तर चाबकाने मारीन'! राज ठाकरेंनी भरला दम

तब्बल वीस महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर गेले होते. पक्षातील अंतर्गत गटबाजी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पक्षांतर्गत बैठकांसाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी शेतकरी संघटना, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वास्तु विशारद, ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटी घेतल्या.

तर सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणींच्यावेळी माझ्याकडे का येत? असे अनेक संतप्त सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले.

दरम्यान भेटीसाठी आलेल्या लोकांना शुभेच्छा भेटवस्तू राज यांच्यासाठी आणल्या होत्या व भेटीदरम्यान लोक आपल्या व्यथा आणि समस्या राज यांना सांगत होते. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा निरोप घेताना राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना चाबूक भेट देत समस्या सांगितल्या त्यावेळी पुन्हा दुसऱ्यांना मतदान केल्यास याच चाबकाने मारेन असा मिश्किल दम राज ठाकरेंनी भरला.

तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणींच्यावेळी माझ्याकडे का येता?

मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं.

जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? असे सवाल उपस्थित करत आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा अस आज राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे.

तसेच, निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कुणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्या नावाने टाहो फोडता आणि परत निवडणुका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खेळत आहात? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मात्र काय करतो आहोत त्याचं भान ठेवा असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

टॅग्स :NashikRaj Thackeray