भावाचा सोहळा पाहण्यासाठी राज आले कुटुंबाला घेऊन!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- आता भावाच्या शपथविधीसाठी राज ठाकरे आपल्या कुटुंबाला घेऊन या सोहळ्यासाठी दाखल झाले

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असतानाच आता शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे निमंत्रण त्यांचे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात आले. त्यानुसार आता भावाच्या शपथविधीसाठी राज ठाकरे आपल्या कुटुंबाला घेऊन शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का हा मोठा चर्चेचा विषय होता. मात्र, आता ते शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांना व्यासपीठावर जागाही देण्यात आली आहे. राज ठाकरेंना मातोश्रीहून निमंत्रणासाठी फोन आला होता. त्यामुळे आता ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray present with Family in Oath Ceremony of Uddhav Thackeray