आता परप्रांतीय घुसणार नाहीत याकडे मनसेचे लक्ष : राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत मराठी मुलांना न्याय मिळावा यासाठी तयारी कशी करावी यासाठी एका तज्ज्ञांची मुलाखत घेऊन ती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर राज यांनी आणखी एक खरमरीत पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी भरतीसाठी व्यवस्थित तयारी करा तसेच या भरतीत बाहेरचे घुसणार नाहीत व फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल याकडे महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं, असा आदेश दिला आहे.  

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तज्ज्ञ आकाश जाधव यांची मुलाखत घेतली असून त्यात रेल्वेभरतीसाठी विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी, कसा अभ्यास करवा, अर्ज कसे भरावेत याची सविस्तर माहिती सांगितली आहे. 

रेल्वेभरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2008 साली एक मोठं आंदोलन उभारलं होतं. याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मुलांना रेल्वेभरतीत नोकरी मिळावी यासाठी मनसे झटत असते. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी स्वतः यात लक्षात देऊन मुलांना काही अडचण आली तर मनसैनिक तुमच्या पाठिशी आहे असे सांगितले आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com