Raj Thackeray म्हणाले, शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, फुकटचं श्रेय घेऊ नका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political latest news

बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले

Raj Thackeray म्हणाले, शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, फुकटचं श्रेय घेऊ नका..

मुख्यमंत्री शिंदे यांनी सेना आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (shiv sena) गळती लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेनेच्या फुटीला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (raj thackeray says to devendra fadnavis)

याला जबाबदार कोण ? शिवसैनिकांनी शिवसेना फोडली की भाजपनं ? राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी (sharad pawar) शिवसेना फोडली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामागे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे (raj thackeray) यांनी स्पष्ट केल आहे.

हेही वाचा: Kadam V/S Thackeray : कदमांच्या विरोधात बोलाल तर..; रामदास कदम, उद्धव ठाकरे समर्थकांत बाचाबाची

राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मला त्या दिवशीच भेटण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. तर ते यावर हसायला लागले. ती गोष्ट तुम्ही, अमित शहा किंवा भाजपने घडवलेली नाही. त्यामुळे याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता, असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले. परंतु शिवसेनेतील फुटली संजय राऊत जबाबदार नाहीत. ते सकाळी टीव्हीवर येतात, त्यांची ती स्टाईल आहे. त्यांचा तो अहंकार आणि त्यांची बोलण्याची शैली यामुळे माणसं वैतागली आहेत. राऊत रोज तेच तेच बोलतात, असे लोकही म्हणू लागले, त्यामुळं राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: Ramdas Kadam : 'त्या' दिवसापासून आजपर्यंत मी मातोश्रीवर गेलेलो नाही - रामदास कदम

राऊतांनी सतत भाजपवर टीका केल्यानं राज्यात सत्तांत्तर झाले. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा आहे. सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागलेत त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

Web Title: Raj Thackeray Says To Devendra Fadnavis Responsible Uddhav Thackeray To Rebel Of Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..