भाजप निवडणुकीत आपट्याची पानं वाटणार का?: राज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई- सरकारने काळ्या पैशाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, तो ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष (भाजप) निवडणूकांमध्ये काय आपट्याची पाने वाटणार काय? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, तो ठीक आहे. पण
येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका व उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजप सरकार काय आपट्याची पाने वाटणार आहेत काय?’

दरम्यान, मोदी सरकारच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे तर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे.

Web Title: raj thackeray slapped bjp for black money