
Raj Thackeray : "ज्यानं हल्ला केला त्याला..." ; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी राज ठाकरेंचा इशारा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर पहिल्यांदा बोलले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. कोणतीही सत्ता नसताना कार्यकर्त्यांची उर्जा पक्ष पुढे नेते असते, असे राज ठाकरे म्हणाले. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले, हल्ला करणाऱ्याला प्रथम कळेल की त्याने हल्ला केला आणि नंतर सर्वांना कळेल हल्ला कुणी केला. माझ्या मुलांचे रक्त मी असे वाहू देणार नाही.
लोक विचारतात काहीजण पक्ष सोडून गेले. लोक म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. मग निवडणुकीत मत का पडत नाहीत. मग ते १३ आमदार आले होते ते काय सोरेटवर आले होते का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
संदीप देशपांडे प्रकरण-
संदीप देशपांडे शुक्रवारी (३ मार्च) मध्य मुंबईतील दादर परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले असताना काही लोकांनी त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅट आणि स्टंपने हल्ला केला. या हल्ला केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन ते चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात देशपांडे यांच्या उजव्या हाताला दोन फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.