ईडी चौकशीवरून राज ठाकरेंचा भाजपलाही टोला; म्हणाले उद्या फासे पलटतील | Raj Thackeray's criticism of BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Narendra Modi

ईडी चौकशीवरून राज ठाकरेंचा भाजपलाही टोला; म्हणाले उद्या फासे पलटतील

मुंबई - राज्यातील नाट्यमय सत्तातरानंतर राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं याचा अंदाज लावणं सध्या तरी कठिण झाल्याचं चित्र आहे. दररोज नवनवीन राजकीय घडामोडी माध्यमांना व्यापून टाकत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. (Raj Thackeray news in Marathi)

हेही वाचा: राज ठाकरेंकडून नूपूर शर्माचं समर्थन; म्हणाले ओवेसी...

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. तर भाजपच्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं. त्याचवेळी ईडी चौकशांवरून भाजपला टोलाही लगावला.

यावेळी ईडीच्या चौकशीवर राज ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ईडीच्या चौकशीला बोलवल तर जा सामोरे. मलाही बोलवलं होतं. मी गेलोच होतो. आणीबाणीच्या वेळी सर्वांना आत टाकलं होतं. हे राजकारण आहे. काल काँग्रेसने तस केलं. आज भाजप करतं. लक्षात ठेवा फासे पलटतात, असं म्हणत राज यांनी भाजपलाही टोला लगावला.

हेही वाचा: "शिंदे समर्थकांच्या बंडांसोबत माझी तुलना नको"; राज ठाकरे असं का म्हणाले?

ईडी लागल्यापासून तुम्ही भाजपप्रणित बोलत आहेत, अशी टीका होती. त्यावर राज म्हणाले की, भाजपवर टीका करायची तेव्ही मी टीका करणारच, असं राज यांनी ठणकावून सांगितलं. हिंदुत्व की हिंदुत्ववाद यावर प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मी हिंदु आहे. माझ्या धर्मावर तुम्ही जाल तर मी हिंदु म्हणून अंगावर येईल. जर तुम्ही मराठी नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर येईल असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

Web Title: Raj Thackerays Criticism Of Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top