‘राज ठाकरेंची भूमिका धर्माधर्मांत वाद पेटवण्याचे कारण ठरतेय’

Raj Thackerays role is a reason to ignite controversy in religion
Raj Thackerays role is a reason to ignite controversy in religionRaj Thackerays role is a reason to ignite controversy in religion

भंडारा : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भोंगे काढण्याची भूमिका धर्माधर्मांत वाद पेटवण्याचे कारण ठरत आहे. अशावेळी राज्य सरकारवर मुस्लिम बांधवांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. भोंग्यांचा विषय सामाजिक असेल तर आपणही त्याचा वापर करतो. तेव्हा इतरांना त्रास होतो. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना समजून घेणे आवश्‍यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले. (Raj Thackerays role is a reason to ignite controversy in religion)

भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सरकार पडण्याची आम्ही वाट पाहत आहोत. परंतु, हे सरकार पडतच नाही आहे. काँग्रेसमधील काही असंतुष्ट आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे या सरकारमधील कामाबाबत तक्रार केली आहे. काँग्रेसने (Congress) ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. त्यानंतर मोठा पक्ष या नात्याने आम्ही सरकार स्थापन करू, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Raj Thackerays role is a reason to ignite controversy in religion
सोनिया गांधींनी घेतली बैठक; प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावाबाबत असंतोष

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ट्रायल होती. अखिलेश यादव यांच्यासोबत ममता बॅनर्जी व इतर मोठ्या नेत्यांनी विरोधात प्रचार केला. परंतु, उत्तरेत भाजपला बहुमत मिळाले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीतही रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत सत्तेत असेल, असे भाकीत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे यांनी भगवा अंगावर घेऊ नये

राज्यात सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरू केलेला भोंग्यांचा विषय सुरू आहे. सगळ्यांच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत भोंग्यांचा वापर होतो. त्याचा इतरांना त्रासही होतो. राज ठाकरे यांनी मनसेच्या ध्वजावर भगवा, पांढरा, हिरवा, निळा अशा सगळ्याच रंगाचा समावेश केला आहे. सध्याच्या काळात सगळ्याच रंगांना सोबत घेऊन चालण्याची आवश्‍यकता आहे. निव्वळ वाद पेटवण्यासाठीच राज ठाकरे यांनी भगवा अंगावर घेऊ नये, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com