राजनी काढला व्यंगचित्रातून भिडेंच्या आंब्याचा 'रस'

बुधवार, 13 जून 2018

सांगलीच्या संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अजब दावा केला होता, त्यांनी चक्क माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना मुले होतात असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची सर्वच स्तरातून खिल्ली उडवली गेली. आता या वक्तव्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून समाचार घेतला आहे. 

पुणे- सांगलीच्या संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अजब दावा केला होता, त्यांनी चक्क माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना मुले होतात असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची सर्वच स्तरातून खिल्ली उडवली गेली. आता या वक्तव्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून समाचार घेतला आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून भिडेंना चिमटा काढताना, त्यांनी एक बाई दुसऱ्या बाईच्या हातात बाळ देताना दाखवले आहे आणि त्याला आंब्याचे डोके आहे. दुसरी बाई ते बाळ घेताना भिडेंच्या बागेतून वाटतं, असे बोलल्याचे दाखवले आहे.

सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळते. मात्र, वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी 'यूपीएससी'ची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नसल्याची अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली होती. त्यामुळे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही सरकारी अधिकारी बनता येणार आहे. या निर्णयाचीदेखील राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचितत्रातून खिल्ली उडवली आहे. 

व्यंगचित्रात त्यांनी एका अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला दाखवले आहे, तर त्याच्या पाठीवरुन उडी मारुन एक व्यक्ती जाताना दाखवली आहे. तर त्याच्या स्वागतासाठी मोदी-शहा उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. ते व्यक्ती आयता बळावर पदाचा उपभोग घेणार. म्हणजेच, आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची काहीच किंमत नाही असे राज यांना आपल्या व्यंगचित्रातून दाखवायचे आहे.

Web Title: raj thackrey creates cartoon on bhides mangoes issue